निम्मं वर्ष संपलं... आपल्या नववर्ष संकल्पाचं काय झालं ??
निम्मं वर्ष संपलं... आपल्या नववर्ष संकल्पाचं काय झालं ?? Blog By : Ashish D. Mane नवीन वर्ष सुरु झालं कि नवनवीन संकल्प करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशन मध्ये जुन्या वर्षाला लाथा मारून नवीन वर्षाच्या स्वागतात व मित्र मैत्रिणींना “हैप्पी न्यू ईअर” चे मेसेजेस फॉरवर्ड करून थकल्यानंतर अनेक कठोर संकल्प काही जण करतात. संकल्पांची ब्ल्यू प्रिंट किंवा वचननामा, जाहीरनामा देखील बरेच जण तयार करतात. पण बरेचदा ब्ल्यू प्रिंट, वचननामा किंवा जाहीरनाम्यातले सर्व विषय तडीस जात नाहीत तसेच मनाशी केलेले सर्व संकल्प देखील पूर्ण होत नाहीत. या वर्षात नित्यनेमाने व्यायाम करणार, पुस्तके वाचणार, आवडीचे छंद जोपासणार, रोज डायरी लिहिणार, सिगारेट सोडणार, नवीन गाडी घेणार, दारू कमी पिणार, आई वडिलांच्या पाया पडणार, नातेवाईक अथवा मित्रमैत्रीण यांच्या वाढदिवसाला न चुकता फोन करणार वगैरे वगैरे नाना संकल्प आपण करतो. एखादा मुरब्बी राजकारणी नेता जसे निवडणूक आल्यावर आश्वासनांची खैरात करतो पण पूर्ण एकही करत नाही त्याप्रमाणे आम्ही संकल्पांची खैरात करतो. हे संकल्प करताना मोबाईल वर ...